पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यासह जेजुरी दौंड यवत खेड अशा विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळीतील आठ जण व चोरीचा माल घेणारा व्यापारी अशा नऊ जणांना गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस पथकांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे ४८ गुन्हे उघडकीस आले असून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्ट्या व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करून एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने हस्तगत केला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ही रोहित्र चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केल्याने सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे. या टोळीकडून शिरूर पोलीस स्टेशन येथील १९ गुन्हे, शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत १० गुन्हे, रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ५ गुन्हे , खेड जेजुरी दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी एक गुन्हा असे रोहित्र चोरीचे ४८ गुन्हे उघडी झाले आहे.
विशाल खंडू पवार (वय २५ रा तांबेवाडी वडगाव सावताळ ता पारनेर जि अहमदनगर) प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २६ रा साकूर गाडेकर ता संगमनेर अहमदनगर) ओमकार अजित घोडेकर (वय १९ रा साकुर घोडेकर मळा ता संगमनेर जि अहमदनगर) आदेश सयाजी भुजबळ (वय १९ रा साकूर हळदावस्ती ता संगमनेर जि अहमदनगर) हर्षल राजेंद्र शिंदे (वय २४ रा साकूर गाडेकरमळा ता संगमनेर जि अहमदनगर ) श्रीकांत शिवाजी जाधव (वय २२ रा सातकरवाडी दहीवडी ता शिरुर जि पुणे) करण नाना माळी ( वय १९ रा दहिवडी मांजरेवस्ती ता शिरुर जि पुणे मूळ रा वांगदरी ता श्रीगोंदा जि अहमदनगर) सोनू विकास धुळे (वय १८ रा आंबळे ता शिरुर जि पुणे मूळ गाव वाडेबोल्हाई थेऊर ता हवेली जि पुणे )यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल
दिपक पांडुरंग सांगळे (वय २७ चंदा भंगारविक्री रा व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागापूर ता जि अहिल्यानगर ) याला विकल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे
पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे गुणे रोजच वाढत होते अनेक गुन्हे दाखल करणेत या विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.
विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झालेनंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागाती पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या होत्या यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तौन तपास पथके तयार करणेत आली होती.तपास पथकांनी शिरूर पोलीसांचे मदतीने गुन्हयांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळा कडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज ,स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. हे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपीना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करणेत आली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आठ आरोपींना अटक केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्हा करताना त्यांनी वापरलेल्या एक पिकप जीप, सहा दुचाकी वाहने, जप्त केली त्यातील एक दुचाकी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीतील तांब्याच्या पट्ट्या व तांब्याच्या तारा पाचशे किलो व वाहने असा मिळून 14 लाख 15 हजार रुपयाचा पोलिसांनी जप्त केला आहे. तर आरोपींनी 48 गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
गुन्हयातील आरोपी नामे विशाल पवार याचे वर एकूण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याचेवर ०३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्हयात फरार आहे.
ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श पंकज देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक संजय
जाधव, पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोलिस उपनिरिक्षक अभिजीत सावंत, शिरूर पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहोवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल
शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पो स्टे चे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करीत आहे