विशेष विद्यार्थ्यांनी केले योगासनांचे वेगवेगळे प्रात्यक्षिक
शिरूर
( प्रतीनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथील जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष मुलांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात सर्व विशेष विद्यार्थ्यांनी क्रिडा शिक्षक संजय पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केले असून यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षासन, ताडासन, अर्धचक्रासन, गरुडासन, मयूरासन, ञिकोणासन, शशांकसन इत्यादी योगासनांसह कपालभारती, प्राणायाम, ध्यान या योगक्रिया सामुहिकपणे सादर केल्या. तर यावेळी बोलताना योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे असून योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होत असल्याचे मत मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी व्यक्त केले. तर वसतिगृहात नियमितपणे विशेष विद्यार्थ्यांची योग क्रिया घेण्यात येते त्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा होत असल्याचे अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे यांनी सांगितले. दरम्यान निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व विशेष विद्यार्थ्यांना चित्रकला पुस्तिकांचे वाटप करण्यात आले, यावेळी विशेष विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील योग दिन निमित्त आयोजित निमित्त कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फोटो खालील ओळ – पिंपळे जगताप ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात योग दिन साजरा करताना विद्यार्थी व शिक्षक.