शिरूर
( प्रतिनिधी ) वढू बुद्रुक ता. शिरुर येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेत संस्थेत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगासनांच्या विविध स्पर्धेंचे आयोजन करत मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेत संस्थेत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुले, कर्मचारी तसेच ग्रुहमातांसह योग दिन साजरा करण्यात आला, यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापक लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक आनंद सागर, प्रकाश कोठावळे, मिनी एम जे, मोना मैडम, मीना भागवत, निकिता वाटकर, तेजस्विनी पवार, नेहा पोहेकर, विशाल सैंदाणे, स्वाती पाटील, सुमित इंगळे, विष्णु सूर्यवंशी, सुशील पोहेकर यांसह आदी उपस्थित होते, तर योगमुळे श्वासोच्छवासाची क्षमता, सामर्थ्य आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत होत असल्याचे माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी सांगितले, दरम्यान माहेर संस्थेच्या वतीने नित्य योगासने केली जात असल्याने मुलांमध्ये योगाबाबत विशेष आकर्षण असल्याने मुलांच्या माध्यमातून विविध योगासानांच्या योग स्पर्धा आयोजित केल्या असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना आणि विजेत्या मुलांना उत्कृष्ट बक्षिस वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वावरे यांनी केले तर प्रसेनजीत गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – वढू बुद्रुक ता. शिरुर येथील माहेर संस्थेत योग दिन साजरा करताना विद्यार्थी.