यावेळी उषा वेताळ यांनी मुलांकडून योगाचे प्रात्यक्षिक तसेच झुंबा डान्स करून घेतला . मुलांद्वारे झाडाचा आकार तयार करून झाडे लावा, झाडे वाचवा हा संदेश देण्यात आला. या वेळी शिरुर नगरपरिषद शाळा क्र. 05 चे मुख्याध्यापक संतोष चव्हाण व शाळा क्र - ७ च्या मुख्याध्यापिका सुजाता भोसले तसेच शिक्षक नंदा वेताळ, वंदना भोसले, मीरा थोरात, अंजली माने, कुसुम लांघी, भानुदास हंबीर, समिधा यादव, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी तथा प्रशासक स्मिता प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम झाला .
शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक पाच व सात मध्ये योग दिन साजरा
जून २१, २०२४
0
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरूर नगरपरिषद शाळा क्र. 05 व 07 मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
Tags