शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील एका कंपनीच्या व्यवस्थापकास शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक अशोक रामहरी लोंढे (वय ३२ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
सिद्धार्थ अनिल दुबे रा. गणेशनगर सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे सणसवाडी ता. शिरुर येथील लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक अशोक लोंढे हे कंपनीत आलेले असताना कंपनीचे सुपरवायझर अनिल दुबे यांचा मुलगा सिद्धार्थ कंपनीत आलेला असल्याने लोंढे यांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकास सिद्धार्थला कंपनीत येऊ देत जाऊ नका असे म्हटले असता सिद्धार्थ याने व्यवस्थापक लोंढे यांना शिवीगाळ, दमदाटी करत विटेने मारहाण करत जखमी केलें, याबाबत लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक अशोक रामहरी लोंढे वय ३२ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सिद्धार्थ अनिल दुबे रा. गणेशनगर सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.