शिरूर दिनांक ( प्रतिनिधी )
शिरुर शहरातील काचीआळी येथे मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे एक तोळा वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोघा युवकांनी हिसकावल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघा अज्ञात दुचाकी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शशिकला मूळचंद गादिया (वय ७३ वर्षे रा. मुंबई बाजार शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरुर शहरातील काचीआळी येथून मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या शशिकला गादिया या ज्येष्ठ महिला जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी गादिया यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र हिसकावून ओढून घेऊन पळून गेले, फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर रोड रॉबरीचा गुन्हा दाखल केला असून,
पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.