शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) व्यसनामुळे मानवी शरीरावर मोठा दुष्परिणाम होत असल्याने युवकांनी कोणत्याही अमली पदार्थाच्या आहारी न जाता व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले आहे.
शिक्रापूर ता शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड बोलत होते, याप्रसंगी प्राचार्य सोनबापू गर्द्रे, उपप्राचार्य सुरेश गंगावणे, पर्यवेक्षक पोपट मेरगळ, पोलीस हवालदार संदीप कारंडे, शंकर साळुंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे, नानासाहेब गावडे, सुनील दिवटे, कुंभार ज्ञानेश्वर, गणेश मांढरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव असावी असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल होईल असे यश प्राप्त करावे तसेच आजच्या युगात मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा सदुपयोग करावा तसेच अमली पदार्थ पासून दूर राहून अमली पदार्थाचे दुष्परिणाम इतरांना सांगावे असे देखील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब गावडे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी केले आणि ज्ञानेश्वर कुंभार यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन बाबत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व आदी.