शिरुरमध्ये काकडी विक्रीस आलेल्या शेतकऱ्याला मारहाण
शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) शिरुर शहरातील बाजार समिती आवारात शेतातील काकडी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला जुन्या भांडणाच्या वादातून हत्याराने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले असून सात ते आठ जणांनवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कैलास भाऊसाहेब शेळके (वय ४२ वर्षे रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आशिष संपत थेऊरकर, संपत जयवंत थेऊरकर (रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांसह )आठ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काकडी विकण्यासाठी शेतकरी कैलास शेळके हे आलेले असताना त्यांच्या गावातील आशिष थेऊरकर व काही इसमांनी कैलास यांना गावातील जुन्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आशिष याने कोणतेतरी धारदार हत्यार घेऊन कैलास यांच्या पायावर मारून जखमी केले तसेच यावेळी मारहाण करणाऱ्या अन्य लोकांनी तू गावातच कसे राहतो ते बघतो अशी धमकी दिली, असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश आगलावे हे करत आहे.
