प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील इंदिरा आवास घरकुल घोटाळा प्रकरणी सुमारे २० वर्षांपूर्वी घरकुल मिळालेल्या लाभार्थी उषा रणदिवे यांना अद्यापपर्यंत ते घरकुल च मिळाले नसल्याने त्यांना आता कोणी घर देता का घर म्हणण्याची वेळ आल्याने तेव्हा मंजूर झालेले घरकुल त्यांना मिळालेच नाही,कुठे,कसे गायब झाले ? यात दोषी कोण कोण ? दोषींवर कारवाई व्हावी या न्याय मागणीसाठी उषा रणदिवे यांनी आपल्या कुटुंबा समवेत आज सोमवार दि. २४ रोजी शिरूर तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरु केले आहे.
या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांचेकडील प्राप्त सूचनेवरून सन २००३ साली ग्रामपंचायत जांबूत येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचेमार्फत शनिवार दि. २२ रोजी जांबूत येथे स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला.
या पंचनामा मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस.डी. दणाणे , विस्तार अधिकारी बी.आर. गावडे व ए.आर. गावडे यांचेसह पोलीस पाटील राहुल जगताप , ग्रामविकास अधिकारी एच.एल.चव्हाण यांनी केलेल्या स्थळपाहणीत इंदिरा आवास घरकुल योजनेत उषा रणदिवे या लाभार्थीला मंजूर झालेले घरकुल म्हणून जांबूत गावठाण हद्दीतील सार्वजनिक समाज मंदिराचे दक्षिण बाजूला उत्तर मुखी सिमेंट पत्रा असलेले पक्के बांधकाम स्वरूपाचे घर दाखविण्यात आले आहे.मात्र दाखविण्यात आलेल्या घरात गावातील अन्य व्यक्ती राहत असल्याने सध्याचे ग्रामविकास अधिकारी एच.एल.चव्हाण यांना या घरकुलाविषयी विचारले असता नमुना नंबर ८ चे नोंदीनुसार सदर घरकुल हे श्रावण सोनवणे व लक्ष्मी सोनवणे यांचे नावे नोंद असल्याचे दिसून आले. यावेळी सदर घरकुल घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून याप्रकरणी योग्य शहानिशा करून लाभार्थी रणदिवे यांना न्याय द्यावा अशी मागणी जांबुत ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान गटविकास अधिकारी महेश डोके यांनी आज दुपारी घरकुल प्रश्नी उपोषणास बसलेल्या उषा रमेश रणदिवे व विशाल रणदिवे या मायलेकांची भेट घेत चौकशी करण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची निवेदनाद्वारे विनंती केली पण जोपर्यंत योग्य न्याय व दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उषा रणदिवे यांनी सांगितले.