शिरूर
( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे शिवण क्लास लावण्याहून पतीसोबत झालेल्या वादातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील रितू पवार या महिलेचे २४ जून रोजी शिवण क्लास लावण्याहून पती अमरसिंग सोबत वाद झाले होते, त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास अमरसिंग कामाला गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास रितूने दरवाजा आतून लावला असल्याने शेजारील नागरिकांनी आवाज दिला मात्र रितू प्रतिसाद देत नसल्याने खिडकीतून आतमध्ये पाहिले असता रितू पवार हिने गळफास घेतल्याचे दिसून आले, सदर घटनेत रितू अमरसिंग पवार वय १८ वर्षे सध्या रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रोकडे तांडा ता. चाळीसगाव जि. जळगाव या विवाहितेचा मृत्यू झाला असून याबाबत अमरसिंग काशिनाथ पवार वय २६ वर्षे सध्या रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रोकडे तांडा ता. चाळीसगाव जि. जळगाव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.
