शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील डोके कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नात सत्काराला फाटा देऊन त्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक भान राखले आहे.
उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असणाऱ्या आमदाबादच्या पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यालयाची २०१९-२०च्या बॅचची दहावीची विद्यार्थीनी पुजा नवनाथ डोके हिचा शुभविवाह १४जून रोजी संपन्न झाला.विवाहातील सत्काराला फाटा देऊन डोके कुटुंबियांनी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य देण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी आज विद्यालयात येऊन हा कार्यक्रम घेतला.या कार्यक्रमासाठी पुजा,पुजाचे पती ओंकार,नवनाथ डोके, पांडूरंग डोके, सावता डोके, सुजाता डोके, रोहिनी डोके, प्रिया डोके, डोके परिवारातील सदस्य उपस्थित होते.
डोके कुटुंबीयांचे हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.
आमदाबाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनीच्या विवाहानिमित्त कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे पांडुरंग थोरात माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी सांगून डोके कुटुंबियांनी सामाजिक भान राखले असल्याचे सांगून डोके कुटुंबियांचे उपक्रमाचे कौतुक केले.