जातेगाव बुद्रुकला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्या
शिरूर (प्रतिनिधी )
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दोन ग्रामपंचायतचा कार्यभार असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जातेगाव बुद्रुकला स्वतंत्र व पूर्णवेळ ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी सरपंच निलेश उमाप यांनी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना निवेदन देत केली आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आदिनाथ वाघोले यांच्याकडे अन्य एका ग्रामपंचायतचा कार्यभार असल्याने त्यांना ग्रामपंचायतला पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही तसेच ग्रामस्थांना आवश्यक असलेले दाखल व उतारे मिळणे अशक्य होत असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत, त्यामुळे जातेगाव बुद्रुक ग्रामपंचायतला स्वतंत्र व पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी सरपंच निलेश उमाप व सामाजिक कार्यकर्ते नवनाथ इंगवले यांनी करत त्याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना दिले असून याबाबत लवकरच कार्यवाही करत पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नेमण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिले आहे.
फोटो खालील ओळ – जातेगाव बुद्रुक ता. शिरुर ग्रामपंचायतला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नेमण्याची मागणी करताना सरपंच निलेश उमाप.