( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील वेगवेगळ्या पोल्ट्री मध्ये कंपनीचे खाद्य पुरवणाऱ्या कामगाराने चाळीस खाद्याच्या गोण्यांचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रामदास बबन औटी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी किरण पोल्ट्री आणि ब्रीडिंग फार्म प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या वतीने पोल्ट्री धारकांना कोंबडीची पिल्ले देऊन त्यांना खाद्य पुरविले जाते, सदर खाद्य पुराव्ण्यास्तही कंपनीने रामदास औटी या कामगाराला नोकरीवर ठेवले आहे, तर रामदास याने कंपनीने पोल्ट्री धारकांना देण्यासाठी दिलेल्या कोंबडीच्या खाद्य्यांच्या गोणी एका दुकानदाराकडे काढून देऊन तब्बल चाळीस गोणींचा अपहार केला, याबाबत किरण पोल्ट्री आणि ब्रीडिंग फार्म प्रायवेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक सुशील राजेंद्र तुपे वय ४४ वर्षे रा. जयप्रकाश सोसायटी माळवाडी हडपसर ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास बबन औटी रा. गणेगाव ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस नाईक प्रतिक जगताप हे करत आहे.