शिक्रापुर परीसरात सात दारु अड्ड्यांवर छापे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांची कारवाई

9 Star News
0

शिरूर ( प्रतिनिधी ) 
          शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या हॉटेल धाबे चायनीज याठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु अड्ड्यांवर शिरुर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकून धडक कारवाई केली अठरा हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
         याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाळासाहेब रघुनाथ घुमे (वय ४९ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), चंद्रशेखर दादाभाऊ घोलप (वय २९ वर्षे रा. टाकळी भीमा ता. शिरुर जि. पुणे), अक्षता अमोल सातकर (वय २९ वर्षे रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे), संतोष सर्जेराव पट्टेकर (वय ३६ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. गितानगर औरंगाबाद जि. औरंगाबाद), रोहन अंकुश डफळ (वय ३६ ब्वार्षे रा. धामारी ता. शिरुर जि. पुणे), लकवीरसिंग जगन्नाथ सिंग (वय ४१ सध्या रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. विलनूरपूर खुद ता. आंनदपूस साहेब जि. रुपनगर राज्य पंजाब), सुरेश गणपत कांगुणे (वय ५८ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले
            शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बेकायादेशीपणे देशी विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळाली, त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार संदीप जगदाळे, प्रशांत गायकवाड, संतोष मारकड, विनायक मोहिते, प्रशांत म्हस्के, दिनेश कुंभार, महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर, अश्विनी दिवटे यांचे पथक तयार करुन तळेगाव ढमढेरे येथे हॉटेल जयमल्हार, निमगाव म्हाळुंगी येथे हॉटेल नयनतारा, दहिवडी येथे हॉटेल आण्णाई, सणसवाडी येथे दोस्ती बियरबार जवळ, जातेगाव खुर्द येथे हॉटेल जगदंब व हॉटेल पंजाबी खालसा ढाबा येथे, करंदी येथे हॉटेल किनारा चायनीज येथे छापे टाकत कारवाई करुन सर्व ठिकाणी मिळून आलेला सुमारे अठरा हजार रुपये किमतीचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
  पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!