शिरूर रामलिग येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली तील विद्यार्थांना फेटा बांधून, खाऊ,फुगे , शालेय साहित्य देऊन त्यांचे स्वागत

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रामलिंग शिरूर या ठिकाणी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करून , वृक्षारोपण करून,शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.
           १५ जून २४ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे नवीन वर्ष ,या दिवशी इयत्ता १ ली मध्ये जाणारे विद्यार्थी यांचा शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये या मुलांचे आनंदाने स्वागत करण्यात आले.
       कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन करून करण्यात आली.त्यानंतर मान्यवर यांचे सत्कार करण्यात आले.
        इयत्ता पहिली तील विद्यार्थांना फेटा बांधून, खाऊ,फुगे , शाळेय साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व मुले आनंदित झाली.यामध्ये त्यांचे पालक ही सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष चा वतीने इयत्ता १ ली ते ७ वी सर्व विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी रामलिंग महिला पतसंस्था चेअरमन - राणी कर्डिले यांनी विद्यार्थांना तुम्हाला दिलेल्या वही चा वापर जीवन घडविण्यात किती महत्वाचा आहे हे सांगितले,सर्व विद्यार्थांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.शिक्षकांचा नेहमीच जीवन घडविण्यात महत्वाचा वाटा असून,त्यांचे ही स्वागत करून आभार मानले.
यावेळी रामलिंग महिला पतसंस्था चेअरमन - राणी कर्डिले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष शहर अध्यक्ष - स्मिता कवाद,युवती अध्यक्षा गीता आढाव ,छाया पाडळे, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुभाष गोरे,युवा उद्योजक शरद पवार,रामलिंग चा सरपंच शिल्पा गायकवाड, मां.उपसरपंच - यशवंत कर्डिले,सदस्य - सणी जाधव,लता इसवे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष - माऊली रेपाळे,उपाध्यक्ष - प्रलाद पवार,सर्व व्यवस्थापन समिती सदस्य,माता भगिनी,शाळेचा मुख्याध्यापिका - सुनीता जगताप व सर्व शिक्षक इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
       यावेळी सामाजिक कार्यकर्ते - सुरेश पाचर्णे,तुषार दसगुडे,केशव शिंदे,सागर नरवडे, कलिम सय्यद,राहील शेख,अमोल चव्हाण, बंटी जोगदंड,सीमा शिंदे,अनिता गवारे,शीतल शर्मा, तृप्ती जोशी, युवराज सोनार,संजय शितोळे,निलेश पवार,ऋषभ मुथा,मोहित साखला,संतोष थेऊरकर,राजुद्दिन सय्यद या सर्व आजी माझी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!