शिरूर
( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील एका महाविद्यालयीन युवतीची सोशल मीडियातून ओळख करुन युवतीला पाठलाग करत युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राजेंद्र शिंदे या युवकावर बाललैंगिक अत्याचार सह विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील संभाजीराजे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीची रोहित शिंदे या युवकाने सोशल मीडियातून ओळख करुन घेतली त्यांनतर रोहित वारंवार युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना युवतीला त्याला टाळत होती, मात्र रोहित युवतीला धमकावत असल्याने युवती त्याच्याशी बोलू लागली परंतु रोहित वारंवार युवतीचा पाठलाग करत असल्याने युवतीने याबाबत आपल्या आई वडिलांना माहिती दिली, दरम्यान युवतीच्या आई वडिलांनी रोहितला समजावून सांगितले तरी त्याच्यात काही बदल झाला नाही आणि त्याने वारंवार युवतीचा पाठलाग करत युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने युवतीने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रोहित राजेंद्र शिंदे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करत आहे.