शिरुर येथील पंचायत समितीचा हॉल मध्ये शिरुर तालुका समन्वय समितीची बैठक झाली .
यावेळी शिरूर प्रांताधिकारी स्नेहा किसवे -देवकाते , शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के,गटविकासआधिकारी महेश डोके , मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे , पोलीस निरीक्षक जोतीराम गुजवंटे , तालुका कृषि आधिकारी सिध्देश ढवळे , वनपरिक्षेत्र आधिकारी प्रताप जगताप , तालुका भूमी अभिलेख आधिकारी संजय भोसले , उपकार्यकारी अभियंता महावितरण नितीन महाजन , सुमीत जाधव , महेश बेसुलखे , संजय गांधी निराधार योजनेच्या सुवर्णा खरमाटे , पुरवठा विभागाचे सतीश पंचरास , यासह विविध शासकिय ४८ खात्याचे आधिकारी बैठकीस उपस्थित होते .
बैठकीत बोलताना पवार म्हणाले की धरणातील गाळाची रॉयल्टी न भरता शेतक-यांना गाळ उपलब्ध करुन देणे , सहाय्यक गटविकासआधिकारी पद निर्मिती या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करुन हे प्रश्न मार्गी लावले आहेत. विधानसभेत आता पर्यत ४५० हून आधिक ताराकिंत सह लक्षवेधी प्रश्न मांडून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला असल्याचे ते म्हणाले . शिरुर बसस्थानकातून एस. टी बसेस शालेय विद्यार्थ्याच्या दृष्टीने सोयीचा वेळेत सोडाव्यात .रेशनिंगचे बायोमेट्रीक सह शिक्षकांच्या ऑनलाईन बदली ,या सारखे महत्वाचे विषय आपल्या पाठपुरावातून मार्गी लागल्याचे आमदार ॲड .अशोक पवार यांनी सांगून
त्याच बरोबर बीएसएनएलच्या आधिका-यांनी बीएसएनएलची ग्राहक संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी केली . यंदाच्या वर्षी शासनाचा वतीने शिरुर तालुक्यात २५ हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र आधिकारी प्रताप जाधव यांनी दिली . शिरुर तालुक्यातील विद्युत डीपीच्या चोरी संदर्भात ग्राम सुरक्षा दल व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उपाय योजना करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले . विविध शासकिय खात्याच्या संदर्भातील कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला .