शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योगदिन साजरा करत विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.
शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला असून यावेळी प्राचार्य संजय शेळके यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.याप्रसंगी प्रशालेचे उपप्राचार्य गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक दिगंबर नाईक, चंद्रकांत देविकर, मच्छिंद्र बनकर तसेच क्रिडा विभाग प्रमुख सचिन रासकर, शालेय क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकु येवले, संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे, भास्कर करंजुले, सुभाष गायकवाड,शरद दरवडे,पूनम पवार, कल्पना भोगावडे,यांनी देखील विद्यार्थासमवेत योग प्रात्यक्षिक सादर केले.तर यावेळी विवेकानंद क्षीरसागर यांनी योग गीत सादर केले.योगाच्या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले गेले.