शिरूर
( प्रतिनिधी ) मुखई ता. शिरुर ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी पुष्पा धोंडीबा खलसे बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुखई ता. शिरुर ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र काळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सरपंच संयोगिता पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी ज्योत्सना बगाटे यांच्या देखरेखेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली, यावेळी सरपंच संयोगिता पलांडे, मावळते उपसरपंच महेंद्र काळे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पलांडे, वर्षा रामगुडे, संगीता पलांडे, रमेश पलांडे, पुष्पा खलसे, सुनिता हिरवे, सुमित पलांडे हे उपस्थित होते, यावेळी उपसरपंच पदासाठी पुष्पा खलसे यांनी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने उपसरपंचपदी पुष्पा खलसे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्योत्सना बगाटे यांनी जाहीर केले, निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच पुष्पा खलसे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गावातील सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच पुष्पा खलसे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ - मुखई ता. शिरुर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवडीनंतर पुष्पा खलसे यांचा सन्मान करताना ग्रामस्थ व पदाधिकारी.