शिरुरच्या बाबुराव नगर येथील पाणी ,ड्रेनेज व रस्त्याच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी डीपी डी सी माध्यमातुन तरतुद करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिरुर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी व्यक्त केले .
शिरुर शहराचे उपनगर असलेल्या बाबुरावनगर येथील प्रश्नान संदर्भात आमदार पवार यांनी नागरिकांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या .
या वेळी तर्डोबावाडीचे माजी सरपंच संभाजी कर्डिले , राष्ट्रवादी ज्येष्ट नागरीक संघाचे उपाध्यक्ष सुरेश पाचर्णे , डॉ अखिलेश राजुरकर ,डॉ भाउसाहेब पाचुंदकर ,गणेश देशमुख ,नंदु जाधव ,दादा चौधरी ,शिरुर शहर युवती अध्यक्षा गिताराणी आढाव ,रामलींग महीला पतसंस्था चेअरमन राणी कर्डिले , हाफीज बागवान ,अमित शिर्के ,पोलीस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे ,विज वितरण कंपनीचे उपअभियंता महेश बेसुळके ,बांधकाम शाखा अभियंता बी एस गाडेकर ,स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक एम बी कांबळे आदी सह नागरीक उपस्थित होते .
यावेळी अशोक पवार म्हणाले कि बाबुराव नगर मधील अंतर्गत रस्त्यानसंदर्भात निधी साठी प्रयत्न करुन आठ ते पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु करणार असुन या ठिकाणची लोकसंख्या वाढली असुन ग्रामपंचायतीने सहकार्य केल्यास नगरपंचायतीसाठी आपण प्रस्ताव देउ जेणे करुन या ठिकाणी नगरसेवक मिळतील त्या साठी ग्रामपंचायतीचा ठराव लागेल असेही पवार म्हणाले .
बाबुराव नगर मधील काही ठिकाणी विद्युत खांबावरील येरीयल बंच केबल टाकण्याचे काम सुरु केले असुन या मुळे विजेमुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे .हळु हळु बाबुराव नगर मधील सर्व समस्या सोडविण्या साठी प्रयत्न केले जातील असेही पवार म्हणाले .
फोटो बाबुराव नगर येथे नागरीकांशी चर्चा करताना आमदार पवार