रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आज रामलिंग येथे वडाचे अनेक झाड लावून ही वट पौर्णिमा साजरी

9 Star News
0
वडाचे झाड लावून वट पौर्णिमा साजरी
शिरूर प्रतिनिधी 
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आज रामलिंग येथे वडाचे अनेक झाड लावून ही वट पौर्णिमा साजरी केली.
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वट पौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे.सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले .ते याच वडाच्या झाडाखाली म्हणून सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी मनोभावे या वट वृक्ष पूजा करतात.
परंतु सद्या समाजात याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत,अनेक महिला या झाडाची फांदी तोडून घरी पूजा करतात,झाडे तोड होत आहे,यामुळे वातावरणातील ऑक्सिजन कमी होत चालला आहे,म्हणून महिलांनी सण साजरे करावेत,पण त्याचे शास्त्रीय कारण पण पहावे.
कोरोना काळात ऑक्सिजन न मिळाला मुळे अनेकांना प्राण गमवावे लागले.
म्हणून सर्व माता भगिनी यांना माझी विनंती आहे, वट पौर्णिमा हा सण साजरा करावा पण या दिवशी प्रत्येक स्री ने एक जरी वडाचे झाड लावून ते वाढवले तर तेच सर्वांना प्राणवायू देऊन दीर्घ आयुष्य मिळेल. कारण वडाचे झाड याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. हजारो वर्ष हे झाड जगते ,या झाडा प्रमाणेच सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो,याच वटपौर्णिमा दिवशी सर्वांना शुभेच्छा राणी कर्डिले - अध्यक्षा - रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांनी दिल्या.
यावेळी उपस्थित सर्व महिलांनी वडाची पूजा करत प्रत्येक वर्षी वडाचे एक झाड लावून वट पौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प केला.
यावेळी गीता आढाव,अर्चना कर्डिले,dr. वैशाली साखरे,राणी शिंदे,छाया अल्हाट,ममता गोसावी,ज्योती गोसावी,कोमल जामदार,संगीता कर्डिले अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्षा - राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!