शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाचे बॅनर निकाला आधीच

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
           शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाची एक्झिट पोलने शाश्वती दिल्याने शिरूर येथील नगरसेविका अंजली थोरात यांनी आढळराव यांच्या विजयाचे बॅनर लावले त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
         लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर होताच आणि त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉ.अमोल कोल्हे अशी लढाई होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरचं पुण्यात शिरूर शहरात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले. शिरूर मधील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खंदे समर्थक असणाऱ्या शिरूर नगर परिषद मा.नगरसेविका महिला बाल कल्याण सभापती अंजली थोरात यांनी हा विजयाचा बॅनर लावला आहे.
         शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांच्या विजयाची खात्री असल्याने हे बॅनर लावण्यात आले आहे त्यामुळे शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गाट ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आर पी आय व सर्व मित्र पक्ष यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण व उत्साह दिसून आला आहे.
         
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!