ओतूर येथे ७२ वर्षव ृद्धाच्या खुनातील सात आरोपींना ४८ तासाच्या आत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व ओतूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केले जेरबंद

9 Star News
0
ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनासहीत दरोडयाचे गुन्हयाचा ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी उघडकीस आणला आहे.
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
ओतूर ता. जुन्नरv दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या सात जणांनी 72 वर्ष वृद्धाचा मारहाण करून गळा दाबून खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे यातील सात आरोपींना 48 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ओतुर पोलीस स्टेशन पथकाने ताब्यात घेतले असून यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
      विलास बाबा वाघ (वय २० वर्षे) प्रकाश बाबा वाघ (वय १९ वर्षे), भिमा गणेश हिलम (वव २५ वर्षे, तिघेजण रा. कन्या शाळा जवळ, ओतूर ता. जुन्नर जि पुणे), यांचेसह इतर चार विधीसंघचीत बालक (अल्पवयीन मुले) यांना ताब्यात घेतले आहे.
      नवाब अहमद शेख (वय ७२ वर्षे सध्या रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे) या वृद्धाचा खून झाला आहे. 
       शादाब नवाय शेख, (वय ४२ वर्षे, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि अहिल्यानगर ) यांनी फिर्याद दिली होती.
       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 
दिनांक ८/०६/२०२४ रोजी नवाब अहमद शेख (वय ७२ वर्षे सध्या रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे) हे एकटेच ओतूर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांचे पडीक बिल्डींगमध्ये राहत होते, ओतूर येथील कांदा मार्केट येथे मिळेल ते काम करत होते. आठ जून रोजी ते राहत असलेल्या ठिकाणी ते मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यांचे हनुवटोबर व गळयावर मारहाण झालेली होती, त्यांचा गळा दाबून खून करणेत आलेला होता. यावरून ओतुर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा अज्ञात कारणावरून अज्ञात लोकांनी खून केला असल्याचा प्राथमिक तपासात आढळून आले होते.
     नवाब शेख यांना अज्ञात व्यक्तीने कोणत्या कारणासाठी मारले याचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या खुनचा तपास करावा अशा सूचना दिल्या या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व ओतूर पोलिस स्टेशनचे तपास पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी ७ इसमांची संशयित हालचाल आढळून आली. त्याप्रमाणे सदर संशयित इसमांवर लक्ष केंद्रीत करून स्थानिक गुन्हे विभाग व ओतूर पोलीस स्टेशनच्या पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची ओळख पटवून विलास बाबा वाघ (वय २० वर्षे) प्रकाश बाबा वाघ (वय १९ वर्षे), भिमा गणेश हिलम (वव २५ वर्षे, तिघेजण रा. कन्या शाळा जवळ, ओतूर ता. जुन्नर जि पुणे), यांचेसह इतर चार विधीसंघचीत बालक ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांनी नवाब शेख यांचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले व त्यांचेकडे मयत व्यक्तीचे चोरी केलेले दोन मोबाईल मिळून आले आहेत. त्या सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याचे उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल खुनाच्या गुन्हयास भा.दं.वि.का.क. ३९६, १२० (ब) हे कलम वाढविणेत आलेले आहेत. आरोपी क्र १ ते ३ यांना न्यायालयासमक्ष हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेवून पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत .

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अप्प्रर पोलीस अधीक्षक श् रमेश चोपडे, जुन्नर विभागांचे एस.डी.पी.ओ. रविंद्र चौधर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ओतूर पो स्टे चे सपोनि लहू चाटे, पोसई अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, अक्षय सुगे, ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार महेश पठारे, देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी, नदीम तडवी, या पथकाने केली.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!