पुणे जिल्ह्यातील हिट अँड रण प्रकरणात एका बड्या बांधकामव्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याची घटना देशभरात गाजत असताना नुकतेच शिरुर तालुक्यात या पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन वडगाव बांडे ते न्हावरे रस्त्यावर आरणगाव जवळ एका पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक देऊन दुचाकी वीस ते तीस फूट फरफड्त नेऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील एकाचा मृत्यू तर एकदम गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात दुचाकीवरील अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३० वर्षेरा. वडगाव बांडे ता. दौंड जि. पुणे )याचा मृत्यू झाला तर महिंद्र रावसाहेब बांडे (वय२६ वर्षे रा. वडगाव बांडे ता. दौंड जि. पुणे) हा जखमी झाला,
सतिश विठ्ठल मेमाणे (२६ रा. वडगाव बांडे ता. दौंड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीसस्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटिल संतोष निवृत्ती लेंडे(अरणगाव, ता. शिरूर जि. पुणे) व त्याच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पाटिल लेंडे यांना ताब्यात घेतले आहे.,
याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे सतिश विठ्ठल मेमाणे (रा. वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली .
याबाबत शिक्रापूर पोलीसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणेन दि 31 मे 2024 रोजी सकाळी 10:15 च्या सुमारास मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे हे दोघेही स्प्लेंडर मोटार सायकल क्रं एम एच 12 व्ही आर 2072 घेवुन रोहित्राचे (Transformer) ऑइल आणण्यासाठी वडगावबांडे येथुन न्हावरे गावात निघाले होते. जाताना मोटार सायकल अरुण विठ्ठल मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र राउसाहेब बांडे हा बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला अरणगावातील पिकअप नंबर एम एच 12 एस एफ 3439 यावरील चालकाने समोरासमोर धडक
हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले यात दुचाकीवरील अरुण मेमाणे व महेंद्र बांडे गंभीर जखमी असल्याने त्याला शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता तेथे डॉक्टरांनी अरूण मेमाणे यास उपचारापूर्वी मयत असल्याचे घोषित केले. तर बांडे याच्यावर उपचार सुरू असून तो स्थिर आहे त्याला अपघाता बाबत विचारले असता पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15 वर्षे) चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवुन सायकलला समोरुन ठोस देवुन सदरचा अपघात केला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघे ही पिकअप सोडुन तेथुन निघुन गेले. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असुन अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असून,
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.
सध्या सर्व ठिकाणी हौस व मौमजेसाठी आपल्याकडे महागाच्या गाड्या ह्या अनेकजण आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती देत आहे. त्यांना या वाहनांबद्दल कुठलीही माहिती नसताना हातात आलेले वाहन भरधाव वेगात त चालवून रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या व वाहनधारकाचे जीवाची खेळत आहे. सध्या नुकतेच पुणे कल्याणी नगर येथे हिट अँड रण प्रकरणात दोन जणांचा जीव गेला या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजली या अल्पवयीन वाहनधारकाचे वडील आजोबा आई व स्वतः गुन्ह्यामध्ये अडकला आहे. तरी नागरिक या प्रकरणातून धडा घ्यायला तयार नाहीत पुन्हा शिरूर मध्ये असाच प्रकार घडल्याने अल्पवयीन वाहनधारकांवर व त्यांच्या पालकांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.