शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील एका विधावा महिलेचे फोटो महिलेच्या नातेवाईकांना पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रफुल्ल रोहकले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील एका विधवा महिलेची तिच्या मैत्रिणीमुळे प्रफुल्ल रोहकले याच्याशी ओळख झालेली होती, त्यांनतर प्रफुल्ल याने महिलेला वेळोवेळी भेटल्यानंतर महिलेचे फोटो काढले होते, तर प्रफुल्ल याने नुकतेच महिलेच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना महिलेचे फोटो पाठवून महिलेबाबत वेगवेगळी चर्चा केली, याबाबत महिलेच्या काही नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार देखील दिली, तर सदर इसमाने महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने महिलेने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रफुल्ल रोहकले रा. श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.