शिरूर शहरात रेव्हेन्यू कॉलनी हॉस्पिटल जवळ विद्युत तारांच्या झाडांच्या फांद्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तोडली परंतु गेल्या आठ दिवसापासून तोडलेली झाडांच्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून आहे या फांद्या उचलणार कोण ? शिरूर नगर परिषद की वीज वितरण कंपनी या दोघांच्या समन्वयाच्या अभावामुळे पादचारी नागरिकांना व वाहनधारकांना नहाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळा आल्यामुळे शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात विद्युत तारांना अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या वीज वितरण कंपनी ही तोडत असते, यासाठी शिरूर नगर परिषदेची परवानगी घेतली जाते. परंतु गेली काही दिवसांपासून शिरूर शहरातील रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील धारीवाल हॉस्पिटल जवळील दोन झाडांच्या मोठ्या प्रमाणात फांद्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी छाटलेले आहे. ज्या फांद्या छाटल्यामुळे वीज वितरण करण्यास कंपनीला अडथळा आता होणार नाही. हे चांगले काम वीज वितरण कंपनीने केले असले तरी मोठ्या प्रमाणात तोडलेल्या ह्या झाडांच्या फांद्या आहे त्या ठिकाणी रस्त्याबरोबर रस्त्याच्या कडेला टाकलेल्या दिसून येत आहे.
या फांद्या तोडून आठ दिवसाच्यावर झाले असून, याची पानेही सूकली आहे. यातील एक झाड बाभळीचे असल्याने हे झाड रस्त्याच्या कडेला टाकले परंतु याच्या फांद्य पूर्णपणे रस्त्यावर आले आहे . बाभळीचे झाड असल्याने काटेरी फांद्या रस्त्यावर येऊन मोटार सायकल पंचर होण्याचेही प्रमाण वाढले असून रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना त्रास होत आहे.
दुसरे झाड धारीवाल हॉस्पिटलच्या पाठीमागेच जवळच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी छाटले आहे. हे झाड छाटून याच रस्त्यावर त्याच्या फांद्या पडलेल्या आहेत.
गेल्या आठ दिवसापासून पडलेल्या या झाडांच्या फांद्यांपासून नागरिक वाहनधारक छोटी मुले महिला यांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे. परंतु या झाडांच्या फांद्या कोणी उचलायचा हा प्रश्न शिरूर नगरपरिषद किंवा वीज वितरण कंपनीला पडला असून, या दोघांमधील समन्वयाच्या अभावामुळे रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या आता काय नागरिकांनी उचलायचे आहेत का? असा असावा नागरिकांमधून उपस्थित होत असून लवकरात लवकर या फांद्या लवकरात लवकर उचलाव्यात अशी मागणी येथील रहिवासी व नागरिकांमधून होत आहे.
यामुळे शिरूर नगर परिषद व वीज वितरण कंपनी यांचा भोंगळ कारभार मात्र समोर आला आहे हे नक्की!
शिरूर रेव्हेन्यू कॉलनी आमच्या घरासमोरच विद्युत तारांना अडथळा येणारे झाडांच्या फांद्या छाटल्या परंतु गेल्या आठ दिवसापासून या फांद्या रस्त्याच्या मधोमध पडलेले आहेत. या फांद्या वाळून गेले आहेत परंतु विद्युत वितरण कंपनी व नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.
संजय ढमढेरे, वकिल,स्थानिक रहिवासी