शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील राऊतवाडी मध्ये असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी मंदिरातील कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातीलदानपेटी तसेच चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पंढरीनाथ भाऊसाहेब राऊत (वय ६५ वर्षे रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील राऊतवाडी मध्ये असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी मंदिराचे पुजारी पंढरीनाथ राऊत हे ९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मंदिरातील आरती करुन मंदिराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून घरी गेले होते, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पुजारी राऊत हे मंदिरात आले असता त्यांना मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तुटलेले तसेच आतमध्ये सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती देत मंदिराची पाहणी केली असता मंदिरातील पितळी वस्तू, दानपेटी तसेच चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, याबाबत पंढरीनाथ भाऊसाहेब राऊत वय ६५ वर्षे रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.