माणसाच्या जीवनातील सुखी जीवनाचा मंत्र योग असून योगाने आपले आरोग्य उत्तम राहत असल्याचे प्रतिपादन योगशिक्षक नाना पोटे यांनी केले.
शिरूर येथील जिजामाता गार्डन योगा ग्रुप च्या वतीने आज जागतिक योग दिनाच्या निमित्त योगसाधना करण्यात आली.
जागतिक योगा दिनानिमित्त योग गुरु पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला.
जिजामाता गार्डन योगा ग्रुप गेली 15 वर्ष योगसाधना करत असून त्यासाठी शिरूर नगरपालिकेचे चांगले योगदान या योगा ग्रुपला मिळत असल्याचे योगशिक्षक मधुकर सातपुते यांनी व्यक्त करून नागरिकांनी महिला पुरुष यांनी उत्तम व सुदृढ शरीर राहण्यासाठी योगा हा व्यायाम नियमित करावा असे आवाहनही सातपुते यांनी केले.
यावेळी योगा शिक्षक नाना पोटे, मधुकर सातपुते, माजी उपायुक्त साहेबराव देशमुख, श्रीकांत सातारकर, ईश्वर नगरे, ललित खाबिया, पंढरीनाथ साळुंके, माजी शिक्षक रंगनाथ बनकर, पोस्टमास्तर शेळके,रमेश सांगळे, श्री . शेजवळ दत्ता रासकर, ग्रामसेवक चांदगुडे, संजय पवार , श्री फलके
नदू कुऱ्हे,नीता गौडा, सुनिता फलके, रूपा खांडरे, सुरेखा इंगळे ,अनुपमा खांडरे ,मनीषा कालेवार, ऋतू संघवी,प्रतिभा बेंद्रे कमल गोपाळे शोभा गायकवाड सीमा शिंदे उषा घावटे प्रमिला आढाव उपस्थित होते.