डॉ . पी.एस.वीरकर यांना महाविद्यालयाने दिलेल्या विविध जबाबदा-या सक्षमपणे पार पाडल्या पाणी , माती , वनस्पती ,स्पर्धा परीक्षा या विषयांवर मोठे प्रभूत्व असल्याचे गौरवउद्गार चेनमन ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी काढले.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील शिरूर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ .पी .एस .वीरकर ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले .
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून डॉ. वीरकर यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते . बोरा महाविद्यालयातील विज्ञान विषयाचे विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे . बोरा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष आहेत . त्याच बरोबर क्रिडा विभागात ही ते कार्यरत होते . सेवानिवृत्ती निमित्त प्राचार्य डॉ . के . सी मोहिते यांच्या हस्ते त्यांच्या सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ .वीरकर म्हणाले की शिक्षक म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध कामे करता आली .जीवनात जेवढ्या अडचणी येतात तेवढे माणूस सक्षम बनतो . इतरांना जमेल तसे मदत करत राहा .परिस्थितीला दोष न देता प्रामाणिकपणे आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा .चांगल्या गोष्टी सातत्याने करत राहा असा सल्ला वीरकर यांनी दिला .
यावेळी जिल्हा भूमी अभिलेख आधिकारी मीनाक्षी वीरकर , गंगा एज्युकेशन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ . राजेराम घावटे , भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा . चंद्रकांत धापटे , अध्यापक प्रबोधिनीचे डॉ. बोबडे , डॉ .प्रणिता वीरकर ,ॲड .प्रतिक वीरकर ,इतिहास विभागाचे प्रा . हरिदास जाधव , प्रा.डॉ.नारायण घनगावकर , प्रा .डॉ .अंबादास केत , प्रा .डॉ .रेणूका गायकवाड ,के.बी काळे ,प्रा . डॉ. सतीश पाटील , प्रा . बाळासाहेब नान्नोर , एम . डी . वाखारे , प्रा . डॉ . चव्हाण , डॉ . कांबळे , दीपक घावटे , आदी यावेळी उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा .अयोध्या क्षीरसागर व प्रा . रतनकुमार ससाणे यांनी केले . आभारप्रदर्शन डॉ . विकास नायकोडी यांनी केले .