शिरूर
( प्रतिनिधी ) डिंग्रजवाडी ता. शिरुर येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटात वादिवाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन्ही गटाच्या चौदा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
डिंग्रजवाडी ता. शिरुर येथील विशाल गव्हाणे व दिपक गव्हाणे यांच्या कुटुंबियांचा जमिनीचा वाद असून त्याबाबत न्यायालय तसेच भूमिअभिलेख विभागात दावा दाखल असून त्याबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाले असून काही निर्णय बाकी आहेत, २१ मे रोजी विशाल गव्हाणे यांच्या शेतात काम सुरु असताना दिपक गव्हाणे व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सदर शेतात आल्याने दोघांमध्ये वादिवाद सुरु होऊन वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले, दरम्यान दोन्ही गटांनी लाकडी काठ्या व लोखंडी गजाने एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली, याबाबत विशाल विष्णू गव्हाणे वय ३६ वर्षे व राणी उर्फ कल्पना विक्रम गव्हाणे दोघे रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दिपक रामभाऊ गव्हाणे, मयूर विजय गव्हाणे, विक्रम रामभाऊ गव्हाणे, सुरज विक्रम गव्हाणे, तुषार दिपक गव्हाणे, कल्पना विक्रम गव्हाणे, दत्तात्रय विजय गव्हाणे तसेच विशाल विष्णू गव्हाणे, प्रियांका संपत गव्हाणे, विष्णू संतोष गव्हाणे, संदीप माणिक गव्हाणे, लक्ष्मी विष्णू गव्हाणे, मनीषा संदीप गव्हाणे व अश्विनी विशाल गव्हाणे सर्व रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.