न्हावरेत ता.शिरूर येथे वांग्याची तीन झाडे जळाल्याने युवकाला मारहाण

9 Star News
0
न्हावरेत वांग्याची तीन झाडे जळाल्याने युवकाला मारहाण
शिरूर 
(  प्रतिनिधी ) न्हावरे ता. शिरुर येथील सुनील शेंडगे या युवकाने त्याच्या शेतातील उसाचे पाचट पेटवले असताना त्यांच्या शेजारील भानुदास शेंडगे यांच्या शेतातील तीन वांग्याची झाडे जळाली, वांग्याची झाडे जळाल्याचा राग मनात धरून भानुदास शेंडगे यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुनील हा शेतात असताना त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारून जखमी करत कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत सुनील खंडू शेंडगे वय २७ वर्षे रा. शेंडगे वस्ती न्हावरा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भानुदास बाळू शेंडगे, सतीश बाळू शेंडगे, आशाबाई सतीश शेंडगे, छकुली भानुदास शेंडगे सर्व रा. शेंडगे वस्ती न्हावरा ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!