पिंपळे जगताप , तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे दोन वेगवेगळ्या घटनेत महीला व तरुणीचा दोघींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे या दोघींच्या मृत्यूबाबत आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
आशा नवनाथ खलसे (वय ५२ वर्षे रा. भैरवनाथ नगर तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
आकांक्षा दिपक पवार (वय १८ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि. पुणे) हिचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पिंपळे जगताप ता. शिरुर येथील आकांक्षा पवार हि युवती घरामागील एका प्लॉटिंग जवळ काही कामाच्या निमित्ताने गेलेली असताना प्लॉटिंगच्या कंपाउंडजवळ गेलेली असताना प्लॉटिंगच्या तारेवर पडलेल्या विजेच्या तारेचा आकांक्षाला धक्का बसून आकांक्षा दिपक पवार (वय १८ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि. पुणे) हिचा मृत्यू झाला तर तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ नगर मध्ये राहणाऱ्या आशा खलसे घराशेजारी काम करत असताना त्यांचा घराशेजारील विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसला यावेळी आशा नवनाथ खलसे (वय ५२ वर्षे रा. भैरवनाथ नगर तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे )या महिलेचा मृत्यू झाला.
याबाबत दत्तात्रय ज्ञानेश्वर दौंडकर (वय ३० वर्षे रा. सांगवी सांडस ता. हवेली जि. पुणे )व सोमनाथ राम गायकवाड वय ३१ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे )यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे व पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.