शिरूर
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील कोंढापुरी रोड लगत शांताराम खेडकर यांच्या पोल्ट्रीच्या जाळीत एक साप अडकल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शुभम वाघ यांना मिळताच शुभम वाघ यांनी तेथे धाव घेत पाहणी केली असता पोल्ट्रीच्या तारेच्या जाळीत एक धामण जातीचा साप अडकल्याचे दिसून आले, दरम्यान शुभम वाघ यांनी सार्थक खेडकर, हितेंद्र शिनलकर, अमोल खेडकर, युवराज खेडकर, पंडित धुमाळ यांच्या उपस्थितीत सदर जाळीत अडकलेल्या सापाची सुखरूपपणे सुटका करुन त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.
फोटो खालील ओळ – रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे पोल्ट्रीच्या जाळीत अडकलेला साप.