शिरूर तालुक्यातील पूर्व भागात 13 मे रोजी झालेल्या गारपीट मुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.
दिनांक 13 मे रोजी सायंकाळी शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील पिंपळसूटी, मांडवगण फराटा, इनामगाव, गानेगाव दुमाला, तादळी या परिसरातील आणि गावांमध्ये गारपीट झाली होती शेतात पडलेला गारांचा पाऊस व वाहणारे वारे यामुळे या भागात असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील ऊस जमीन दोस्त झाला होता, तर केळी पेरू डाळिंब व पालेभाज्याचा इतर फळांना याचा मोठा फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, तर काही शेतकऱ्यांच्या गाईंच्या गुरांच्या गोट्यांची पत्रे उडाले काहींच्या घरांचे पत्रे उडाले होते..
याबाबत निवडणुकीचे कारण सांगून महसूल कर्मचारी व कृषी अधिकारी यांनी पंचनामा करण्यास टाळाटाळ केली होती या भागाची पाणी शिरूरचे आमदार अशोक पवार यांनीही केली होती या भागातील शेतकरी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने व गारपीट मुळे मोठ्या संकटात सापडला असताना आमदार अशोक पवार यांनी याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन गारपीट झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेताचे व नुकसानीचे पंचनामे करावी व त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
पवार यांनी पाहणी केली. शिरूर तालुक्यात अनेक गावात वळवाच्या पावसामुळे डाळिंब ऊस, केळी, पोल्ट्री पत्राशेड च घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. निवडणुकीच्या कामकाजामुळे प्रशासकीय अधिकारी सध्या व्यस्त असले तरी
महसूल प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, तोडणीस आलेले अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब वादळी बाऱ्याने गळून पडले आहे. वादळी बान्ऱ्याने डाळिंब पिकातील क्रॉपकहर देखील फाटले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करून दिलासा द्यावा, वळवाच्या अचानक झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठो प्रयत्पशील असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले