शिरूर
( प्रतिनिधी ) मिडगुलवाडी ता. शिरुर येथील दहा वर्षीय अक्षदा काही वर्षांपूर्वी शेजारील खडकवाडी येथे कुटुंबियांसह कामानिमित्त स्थाईक झालेली असताना नुकतेच तिच्या डोक्यात एका आजाराचे निदान झाल्याने उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असताना मिडगुलवाडी सह परिसरातील नागरिक एकवटत दोन लाखांची मदत मिळवून दिलेली असताना नुकतेच समाजसेवक शहाजी दळवी यांच्या पुढाकाराने ब्रिटानिया कंपनीकडून अक्षदाला पन्नास हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
मिडगुलवाडी ता. शिरुर येथील दिपक मिडगुले हे कामाच्या निमित्याने आंबेगावातील खडकवाडी येथे गेले, त्याची मुलगी अक्षदा सध्या तिसरीत शिक्षण घेत असताना नुकतेच तिच्या शरीरावर सूज येऊ लागल्याने उपचारासाठी पुण्यात दाखल केल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले मात्र उपचारासाठी सात लाखांची गरज असल्याने कान्हूर मेसाई येथील समाजसेवक शहाजी दळवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षदाच्या उपचारासाठी तब्बल दोन लाख रुपये गोळा झाले होते, काही दिवसांपूर्वी खैरेवाडी येथे ब्रिटानिया कंपनीच्या माध्यमातून आयोजित आरोग्य शिबीरवेळी शहाजी दळवी यांनी याबाबतची माहिती ब्रिटानिया कंपनीकचे रवी पवार व सरनेस वाडिया फाउंडेशनच्या व्यवस्थापक कुशाला शेट्टी यांना देत ब्रिटानिया दुध डेअरीचे बाळासाहेब सुक्रे, दगडू खैरे यांच्या माध्यमातून कंपनीकडे कागदपत्रांची पूर्तता केली असता नुकतेच समाजसेवक शहाजी दळवी यांच्या पुढाकाराने ब्रिटानिया कंपनीकडून अक्षदाला पन्नास हजार रुपयांची मदत मिळाली आहे, तर अक्षदाला मिळालेल्या मदतीबाबत अक्षदाचे वडील दिपक मिडगुले, आत्या ज्योती धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
सोबत – अक्षदा मिडगुलेचा फोटो.