शिरूर प्रतिनिधी
शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या तालुक्याच्या विकासासाठी हयात खर्ची केली तुम्ही सदैत त्यांना खबीर साथ दिली या वेळेस महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करा विकासा साठी निधी कमी पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली .
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते . यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते . यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर ,शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील , युवा नेते राजेंद्र गावडे भाजपच्या नेत्या जयश्रीताई पलांडे ,माजी सभापती सुनीता गावडे ,माजी सभापती मंगलदास बांदल, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पांचुदरकर, पंचायत समितीचे सदस्य डॉ सुभाष पोकळे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते .
अजित पवार म्हणाले की शिरूर - आंबेगावसाठी सहाशे कोटी रुपयाचा निधी दिला असुन उर्वरीत प्रश्नासाठीही निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली . सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी तालुक्यातील सहकारी चळवळ समृद्ध केली मात्र त्या ऊलट शिरूर मधील आमदारांनी साखर कारखाना बंद पाडल्याची टिका त्यांनी केली .
या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देण्याचे काम केले आहे .
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाली की उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासारखे दूरदृष्टी नेतृत्व राज्याला मिळाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात तील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील .
यावेळी राजेंद्र गावडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार मंगलदास बादल यांनी मानले .
फोटो : टाकळी हाजी तालुका शिरूर येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार व व्यासपिठावर माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार पोपटराव गावडे