अशोक पवार यांना गाजर दाखवल
त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री व्हायला निघाला का? अजित पवारांनी मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना आमदार होऊन दिले नाही आता मी पण चॅलेंज देतो तू आमदार कसा होतो मी पण लोकांना सांगेल याची अवकात काय आहे आणि आम्ही काय काम केले असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार व शिरूर चे आमदार अशोक पवार यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरे येथे प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर आमदार अशोक एक दिवस अजित पवार यांच्याबरोबर होते त्यानंतर त्यांनी अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादीचे शरद पवार यांची साथ धरली यामुळे शिरूरच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी मिळाला नसल्याचे कालच्या शरद पवार यांच्या सभेमध्ये अनेक नेत्यांनी सांगितले तर अशोक पवार सारखा प्रामाणिक आणि निष्ठा असलेला आमदार शिरूरकरांना लाभला असे गौरव उद्गारही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले हेच खटकले अजित पवारांना तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर तालुक्यांना बापूसाहेब थिटे नंतर मंत्रीपद मिळालेले नाही पुढील काळामध्ये गणिते जुळली तर शिरूर चे आमदार अशोक पवारांना मंत्रिपद देण्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला . याचा धागा धरत अजित पवार यांनी अशोक पवार कसे मंत्री होतात आणि आमदार कसे होतात हेच पाहतो असे बोलून शरद पवार यांच्या बरोबर अशोक पवार यांना ओपन चॅलेंज आणि थोडक्यात दम ही दिला.
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना या अगोदर मागील निवडणुकीत अजित पवार यांनी असे चॅलेंज दिले होते आणि शिवतारे आमदार झाले नाही त्यानंतर 2024 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होत असताना शिवतारे यांनी अजित पवार यांना त्यांची जागा दाखवली होती. याबाबत अजित पवार यांना शिवतारे यांची समजूत घालता घालता नाकीनौ झाले होते. आणि पुन्हा आता शिरूरच्या आमदारांना तसेच ओपन चॅलेंज केल्याने पुढील काळात शिरूर हवेलीचे राजकारण आणखीनच तापणार असून पवार विरुद्ध पवार शिरूर मध्येही होणार हे मात्र नक्की.