शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांना मतदार व गोरगरीब जनतेची पसंती

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष बदलला नसून जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती त्यात आढळरवांना खासदार करायचं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर यातील मधला मार्ग म्हणून मी शिंदे व अजित पवार यांना सांगितले जागाजरी राष्ट्रवादीकडे गेली तरी उमेदवार हा शिवाजीराव आढळराव पाटीलच राहतील त्याच्यासारखा हुशार विकासकामे करणारा गोरगरिब जनतेच्या करीता अहोरात्र झटणारा खासदार हवा आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून, समोरच्या उमेदवारांनी मनसे शिवसेना राष्ट्रवादी असे कित्येक पक्ष बदलले पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाही अशी टीकाही करून कोल्हे हे नाटककार असून त्याच्या सारखी नाटक आढळराव यांना जमत नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली.
       शिरूर येथे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाचखंडी चौक येथे सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
         यावेळी माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धर्मेंद्र खांडरे, आमदार राहुल कुल, महेश लांडगे, जगदीश मुळीक, माजी आमदार पोपटराव गावडे, निरंजन डावखरे, जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जय मल्हार क्रांतीचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे,मंगलदास बांदल,जयश्रीताई पलांडे, शिवाजीराव भुजबळ दादा पाटील फराटे आशाताई बुचके राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रवीकाळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, राजेंद्र जासूद,शिवसेना शहराध्यक्ष मयूर थोरात, सुधीर फराटे, शिवाजी कुऱ्हाडे, मोनिका हरागुडे, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार, आर पी आय शहराध्यक्ष निलेश जाधव, नगरसेविका अंजली थोरात,
उपस्थित होते. 
          प्रत्येक मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे ही निवडणूक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा ची निवडणूक नसून ही निवडणूक देशाचा पंतप्रधान देश कोण मजबूत करू शकतो व देशाचा नेता निवडण्याची निवडणूक असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाला मजबुत बनू शकतात असे राज्याची माजी उप देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देशाला विश्व गौरव बनवण्याची काम मोदी यांनी केले असलेले जे त्यांनी सांगितले. 
           राहुल गांधी यांच्याकडे जे इंजिन आहे या इंजिनमध्ये बातमीची जागा नाही राहुल गांधी स्वतः या इंजिनमध्ये सोनिया गांधी प्रियंका गांधी यांना बसवणार तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना इंजिन मध्ये बसवणार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना इंजिन मध्ये बसवणार या लोकांच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य गोरगरीब दलित आदिवासी या लोकांना बसवण्यासाठी जागा नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंजिनमध्ये दीनदलित अल्पसंख्यांक आदिवासी सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना बसण्यासाठी जागा आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये 25 कोटी गरिबांना घरे गरीब देशाच्या वर आणण्याचे काम केले आहे. 20 कोटी लोकांना स्वतःची घरे दिली आहेत 50 कोटी लोकांना घरगुती गॅस दिले आहेत 60 कोटी लोकांना शुद्ध पाण्याचे पिण्यासाठी घरामध्ये नळ दिली आहे 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले आहे. तरुणांना मुद्रा लोन दिले आहे ते विनाकारण ही मोदींची गॅरंटी आहे. तर 31 कोटी महिलां भगिनींना 80 लाख बचत गट निर्माण केले आहे आठ लाख कोटी त्यांच्यासाठी कर्ज दिले आहे असेही फडणवीस नी सांगितले.
  . यावेळी बोलताना शिरूर लोकसभा मतदार संघाची महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार म्हणून काम करत असताना कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्याचे काम केले आहे. मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याच दिवसापासून पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागलो शिरूर सारख्या शहरांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 72 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली व त्याचे कामही चालू केले तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिरूर येथे उभारलेली शिरूर नगर परिषदेची प्राथमिक शाळेच्यानविन बांधकामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी आणला व त्याचे कामही चालू केले. यासारखे अनेक विकासकामे शिरूर शहरात शिरूर नगर परिषदेसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले . आत्ताचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच वर्षात तोंड दाखवले नसल्याने गावोगावी प्रचारा गेल्यानंतर तेथील नागरिक त्यांचा सत्कार करून त्यांना तुम्ही पाच वर्षात काय काम केले व पाच वर्षात किती वेळा आमच्या गावात आले अशी विचारणा करीत असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगून आपलं अपयश लपवण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे व माझ्या कंपनीवर बिनबुडाचे आरोप अमोल कोल्हे करत असून व मला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे साणून कोल्हे यांना त्यांचा पराभव कळला असल्याचे आढळराव यांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!