शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.८६ टक्के लागला असून, १३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
        शिरूर  तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.८६ टक्के लागला असून, १३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
           शिरूर तालुक्यातून ५ हजार ७०६ विदयार्थी बारावी बोर्ड परीक्षेस बसले होते त्यापैकी ५ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९५.८६ टक्के लागला आहे. 
            तर विद्याधाम प्रशाला शिरूर, श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे, श्री भैरवनाथ विद्यालय करडे, कै.आर.जी. पलांडे माध्य. आश्रमशाळा व ज्यू.कॉलेज मुखई, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी, विद्या विकास मंदिर करंदी, कालिकामाता विद्यालय वाघाळे, श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे, आर.एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज आदी १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
        शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :- चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर (९०.८५), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (९६.८३), भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ (९७.३६), आर.बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (९७.१९), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (९६.९६), छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई (८८.५७), सरदार रघुनाथ ढवळे विद्यालय केंदूर (९१.६६), बापूसाहेब गावडे ज्यू.कॉलेज टाकळी हाजी (९२.७०), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (७९.३१), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (९३.३३), विद्याधाम उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई (९१.०७), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (९६.६८), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (८०.६४), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमाई (७८.५७), श्री संभाजीराजे ज्यू.कॉलेज जातेगाव बुद्रुक (९९.४३), श्री छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा (९६.४२), सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड ज्यू.कॉलेज कासारी (९३.८०), विद्यानिकेतन ज्यु. कॉलेज कोंढापुरी (९४.०४), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (८७.८७),  एस.पलांडे ज्यू. कॉलेज शिरूर (८८.५७), विजयमाला ज्यू. कॉलेज शिरूर (९६.२५), श्री महागणपती ज्युनिअर कॉलेज रांजणगाव गणपती (८९.८८), ग्लोरी ज्यु.कॉलेज कोरेगाव भीमा (९८.४१), स्वातंत्र्य सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (९७.८७),  श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा (९७.९७), आदर्श विद्यालय वरुडे (९५.३३), ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर (९९.२९), श्री वसंतराव डावखरे मेमोरियल ज्यू.कॉलेज शिरूर (९९.५६). यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य व शिक्षकांनी पेढे भरवून अभिनंदन केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!