शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारांचा धिंगाणाशिक्रापूर पोलिसांकडून धिंगाणा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

9 Star News
0
शिरूर दिनांक ( प्रतिनिधी ) 
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रार दारांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोरच एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत आरडाओरडा करुन एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली असून पोलिसांनी दोन्ही कुटुंबावर गुन्हे दाखल केले आहे.
        शिक्रापूर पोलिसांनी गणेश राजाराम दिघे (वय ४३ वर्षे), हिराबाई गणेश दिघे (वय ३८ वर्षे), मनीषा गोरख दिघे (वय ४२ वर्षे), विशाल काळुराम दिघे (वय ३० वर्षे) व लक्ष्मी काळुराम दिघे (वय ५५ वर्षे सर्व रा. दिघे वस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
        याबाबत महिला पोलीस शिपाई उर्मिला रघुनाथ पवार (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे )यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद
                शिक्रापूर ता. शिरुर येथील दिघे वस्ती येथे राहणारे गणेश दिघे व विशाल दिघे यांच्यामध्ये झालेल्या वादाबाबत तक्रार देण्यासाठी दोघे पोलीस स्टेशन येथे आलेले असताना ठाणे अंमलदार संतोष मारकड, आत्माराम तळोले, महिला पोलीस नाईक किरण निकम, उर्मिला पवार हे दोघांची तक्रार ऐकून घेत असताना दोघांचे कुटुंबीय पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले, दरम्यान दोन्ही बाजूच्या लोकांनी पोलिसांसमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करत एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करुन एकमेकांना हाताने मारहाण देखील केली, दरम्यान पोलीस त्यांना शांत करत असताना सुद्धा दोन्ही गटातील व्यक्ती एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याची घटना घडली, याबाबत महिला पोलीस शिपाई उर्मिला रघुनाथ पवार रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गणेश राजाराम दिघे (वय ४३ वर्षे), हिराबाई गणेश दिघे (वय ३८ वर्षे), मनीषा गोरख दिघे (वय ४२ वर्षे), विशाल काळुराम दिघे (वय ३० वर्षे) व लक्ष्मी काळुराम दिघे (वय ५५ वर्षे सर्व रा. दिघे वस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हाडगळे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!