( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे विटांचा ट्रक खाली करण्यासाठी आलेल्या एका इसमाचे दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघाजनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद गरजे व बापू गरजे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) या दोघांवर अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ट्रक चालक संजय हनुमंत गायकवाड (वय ३४ वर्षे रा. राक्षेवाडी रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे )यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एका हॉटेल मध्ये विटांची वाहतूक करणारे ट्रक चालक संजय गायकवाड यांसह कामगार राधाकिसन शिंदे, लखन गायकवाड. सोमनाथ निकम, अमोल निकम असे जेवण करण्यासाठी थांबलेले असताना शरद गरजे व बापू गरजे हे दोघे आले आणि राधाकिसन याच्या सोबत पैशाच्या व्यवहारातून वाद घालू लागले, दरम्यान चालक संजय गायकवाड यांनी त्यांच्याशी चर्चा केली आसरा राधाकिसन कडे आमचे दहा हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे संजय यांनी याबाबतची माहिती त्यांच्या वीटभट्टी मालकांना दिली असता त्यांनी शरद गरजे याच्या मोबाईलवर दहा हजार रुपये पाठवले मात्र शरद याने आम्ही दहा मिनटात राधाकिसनला आणून सोडतो असे म्हणून त्यांच्या जवळील वाहनातून नेले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याला पुन्हा आणले नाही तसेच त्यांच्याशी संपर्क देखील झाला असल्याने याबाबत ट्रक चालक संजय हनुमंत गायकवाड (वय ३४ वर्षे रा. राक्षेवाडी रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी शरद गरजे व बापू गरजे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतिक जगताप हे करत आहे