शिरूर येथील दशक्रिया विधी घाटावरती नाभिक समाजाला केश कर्तनासाठी रुम बांधून व इतर सोयी सुविधा करून देण्यात याव्यात अन्यथा दशक्रिया विधीतील केस कर्तनाच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर शहर नाभिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी पुणे यांना शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब क्षिरसागर,माजी शहराध्यक्ष रणजित गायकवाड,संतोष शिंदे,माजी उपाध्यक्ष गणेश शिंदे,तालुका कार्याध्यक्ष गोरख गायकवाड,शहराध्यक्ष सनी थोरात,निलेश भोसले,प्रितेश फुलडाळे,संतोष गायकवाड,भाऊ गायकवाड, संतोष वाघमारे,संतोष इंगळे,बाळासाहेब गायकवाड,योगेश जाधव,निलेश गायकवाड,समीर शिंदे,संदिप वाघमारे, सोमनाथ देव्हाडे,तेजस गायकवाड,हेमंत गायकवाड यांसह उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिरूर शहरातील दशक्रिया विधी घाटावरती दशक्रिया विधीच्या वेळी केश कर्तनासाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.सदर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे काम करता येत नाही.तरी दशक्रिया विधीच्या प्रसंगी एकाच वेळी चार ते पाच जणांना केश कापण्याचे काम करण्यासाठी तीन फुटी पाच ओटे असलेली रुम व पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी जेणे करुन लोकांची गैरसोय होणार नाही.
सध्या दशक्रिया विधी घाटावरती अंदाजे एक ते दिड कोटी रुपयांचे शुशोभिकरणाचे काम शिरूर नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.परंत् त्या ठिकाणी इतर सर्व धार्मिक विधींचा विचार केलेला आहे.परंतु दशक्रियेच्या वेळी नाभिक समाजाचे सर्वात महत्वाचे पहिले काम असून सुध्दा त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याने नाभिक सभाजाला वंचित ठेवण्यात आलेले आहे.यापूर्वी शिरूर नगरपरिषदेकडे अनेक वेळा मागणी करुन सुध्दा कुठल्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही.ज्या शोकाकुल कुट्ंबातील दशक्रिया विधीचा कार्यक्रम असतो त्या कुट्ंवातील नागरिकांना सुध्दा या गैरसोयीचा मोठया प्रमाणात सामना करावा लागत असल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करुन दाखवित आहेत.दशक्रिया विधी घाटावरती १५ दिवसांत सदर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा दशक्रिया विधीच्यावेळी नाभिक समाजाच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.