शिरुर तालुक्यात वनविभागाकडून बिबट जनजागृती अभियान वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांचा उपक्रम

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पशुधनासह नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने वन विभागाच्या वतीने रात्रगस्त व त्यातून शेतकरी व नागरिकांनी बिबट्या पासून संरक्षण व खबरदारी या उपायोजनांची जनजागृती करण्यात आली.
     शेतकरी व नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या माध्यमातून शिरुर तालुक्यातील विविध गावात बिबट जनजागृती मोहिमेतून करण्यात येत आहे.
                                शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होत असल्याने परिसरात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असताना शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश म्हेत्रे, गौरी हिंगणे, गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, लहू केसकर, चालक अभिजित सातपुते तसेच शिरुर वनविभाग रेस्क्यू टीम यांच्या माध्यमातून शिरुर तालुक्यातील वाजेवाडी, कोरेगाव भीमा, पिंपरखेड, निमगाव म्हाळुंगी, सविंदणे, आलेगाव पागा, वाघाळे, मलठण, कवठे येमाई यांसह आदी ठिकाणी रात्रगस्त सुरु करण्यात आली असून त्याद्वारे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये बिबट जनजागृती करत नागरिकांना बिबट पासून संरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे, तर नागरिकांना मार्गदर्शन करताना प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झाल्यास वनविभागाला माहिती द्यावी, शेतात काम करण्यासाठी एकट्याने जाऊ नये, शेतात घर असल्यास लहान मुलांना एकटे शाळेत पाठवू नये, सायंकाळच्या सुमारास मुलांना एकटे बाहेर सोडू नये, गोठा बंदिस्त ठेवावा, घराबाहेर व गोठ्यात उजेड ठेवावा, उसाच्या शेतालगत गुरे चरायला नेऊ नये, शेतात काम करताना आवाज करावा, मोबाईल वर गाणी लावावीत यांसह आदी आवाहन वनविभागाच्या वतीने शेतकरी व नागरिकांना करण्यात आले आहे.
स्वतंत्र चौकट १ –
वन्य जीव राष्ट्रीय संपत्ती आहे, विनाकारण वन्य प्राण्यांना डिवचू नका, वन्य प्राणी आपले शत्रू नाहीत, बिबट्या भारतात फक्त आपल्या भागात आहेत त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्त्यव्य असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
स्वतंत्र चौकट २ –
बिबट्याने पशुधन ठार मारल्यास १५ हजार नुकसान भरपाई, मनुष्य जखमी झाल्यास उपचार साठी २० हजार, गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, इसम मृत झाल्यास २० लाख पर्यंत मदत शासनाकडून करण्यात येत असते.
फोटो खालील ओळ – शिरुर तालुक्यातील गावांमध्ये भेट देत नागरिकांमध्ये बिबट जनजागृती करताना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!