रांजणगाव गणपतीत युवकाचा अज्ञातांकडून युवकाचा खून
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात सहा ते सात युवकांनी दगड व चाकूने बेदम मारहाण करत युवकाचा खून केल्याची घटना घडल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे सात अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश प्रकाश पाडळे (वय २७ वर्षे रा. सोनेसांगवी ता. शिरुर जि. पुणे याचा) याचा खून झाला आहे.
याबाबत महेश रामदास शेळके (वय ३२ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील लांडेवस्ती येथून महेश शेळके हा युवक २१ मे रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सोनेसांगवी येथे घरी चाललेला असताना लांडेवस्ती येथे कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो रस्त्याचे वळणावर उलटला असल्याने महेश याने टेम्पो चालकांना टेम्पो बाबत माहिती विचारल्याने टेम्पो जवळील युवकांनी महेशला शिवीगाळ केली, त्यांनतर महेशने पहाटेच्या सुमारास त्याच्या आकाश पाडळे व अक्षय शेळके या दोघा मित्रांना बोलावून घेतले, यावेळी कोंबड्यांचा टेम्पो क्रेनच्या सहय्याने बाजूला घेत होते तर जवळ एम एच १६ बी एच ६५१३ हि कार देखील उभी होती यावेळी महेशचे मित्र आकाश व अक्षय यांनी सदर युवकांना महेशला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता तेथील युवकांनी दगड व चाकूने महेशसह दोघांवर हल्ला चढवला यावेळी महेश शेजारी लपून बसला तर अक्षय दुचाकी घेऊन पळून गेला यावेळी आकाश हा पळून जात असताना कोंबड्यांच्या टेम्पो जवळील युवकांनी त्याला पकडून दगड व चाकूने बेदम मारहाण करत त्याचा जागेवर खून केला, सदर सर्व प्रकार लपून बसलेल्या महेश शेळके याने पाहिल्याने त्याने पोलीस स्टेशन गाठले, सदर हल्ल्यात आकाश प्रकाश पाडळे (वय २७ वर्षे रा. सोनेसांगवी ता. शिरुर जि. पुणे) याचा मृत्यू झाला आहे .
याबाबत महेश रामदास शेळके वय ३२ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, पोलीसांनी सहा ते सात अनोळखी युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे हे करत आहे.