रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
गरिबीतूनच मोठे व्यक्तिमत्त्व घडत असते आत्ता मेहनत घेऊन अभ्यास केला तर पुढे तुमचे दिवस हे चांगलेच असणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
        रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा वतीने अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरूर येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
 जान्हवी कवाद हीचा सन्मान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते
    विद्यार्थी यांनी मेहनत करून चांगले यश संपादन केले,याचे कौतुक होणे,त्यातून त्यांना पुढे चांगले यश संपादन करण्याची प्रेरणा मिळावी ,त्यांचा गुण गौरव व्हावा म्हणून करण्यात आले असल्याचे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था अध्यक्ष राणी कर्डिले यांनी सांगितले.
          गुणवंत विद्यार्थ्यांना पेन,बुके ,प्रमाणपत्र  देऊन शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार  अशोक बापू पवार यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यसम्राट आमदार श्री अशोक बापू पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता,प्रत्येक विद्यार्थांनी सी ए, डॉकटर, वकील होणार असे सांगितले.
        तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले त्यात तुमचे आई वडील,शिक्षक सर्वांचे मनापासून अभिनंदन .
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा  राणी कर्डिले ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर शहर महिला अध्यक्षा डॉ.स्मिता कवाद,युवती अध्यक्षा गीता आढाव, युवा नेते  सागर नरवडे यांनी केले.
यावेळी तालुका युवती अध्यक्षा  संगीता शेवाळे,तालुका युवक  अध्यक्ष तुषार दसगुडे,उपाध्यक्ष  केशव शिंदे,शिरूर शहर युवक अध्यक्ष  अमित शिर्के, वकील सेल शिरूर शहर अध्यक्ष  रवींद्र खांडरे,सामाजिक कार्यकर्ते  सुरेश पाचर्णे,कार्याध्यक्ष  कलीम सय्यद,विद्यार्थी उपाध्यक्ष राहील शेख ,सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष  अनिल गायकवाड, शहर विद्यार्थी अध्यक्ष  आशीर्वाद ढगे,उपाध्यक्ष  आदित्य उबाळे,सचिन अभंग ,सोशल मीडिया प्रमुख  प्रशांत पवार, कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते.
     यावेळी 90 टक्के चा पुढे जे विद्यार्थी होते त्यांना सन्मानित करण्यात आले होते.यावेळी 120 विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!