शिरूर (प्रतिनिधी ) कासारी फाटा ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर दुचाकीहून चाललेल्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात आकाश सुरेश दंडवते या युवकाचा मृत्यू झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासारी फाटा ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन आकाश दंडवते हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ जि बि ९९२२ या दुचाकीहून अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चालेलला असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची धडक आकाशच्या दुचाकीला बसून अपघात झाला, दरम्यान अपघातात आकाश गंभीर जखमी झाल्याने त्याला उचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आकाश सुरेश दंडवते वय ३० वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत अनिकेत अनिल अडसूळ वय २५ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार व अमोल नलगे हे करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ . . . . . . .
कोंढापुरी येथील आकाश दंडवते हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता मात्र नुकताच त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या आई वडिलांचा आधार गेल्याने परिसरातून हळ हळ व्यक्त केली जात आहे.
सोबत - आकाश दंडवतेचा फोटो.