शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंगवाडी येथे एका खोलीमध्ये इसमाचा पडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने दारुच्या नशेत पडल्याने डोक्याला मार लागला असल्याचा अंदाज वर्तवत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र पोलिसांच्या तत्परतेने सदर इसमाचा मृत्यू नसून खून असल्याचे उघड होत खुनाचे बिंग फुटले आहे .
चौटकन गौतम (वय ५८ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. प्रतापपूर ता. इटवा जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेलाचे नाव आहे.
रामस्नेही चौटकन गौतम (वय ३१ वर्षे रा. उरुळी देवाची ता. हवेली जि. पुणे मूळ रा. प्रतापपूर ता. इटवा जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश )याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
तरुण धुलारुराम ठाकूर (वय २४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. राजनंदगाव छत्तीसगड) याला खूनप्रकरणी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंगवाडी येथे एका खोलीमध्ये १७ मे रोजी दुपारच्या सुमारास इसमाचा मृतदेह मिळून आला, दरम्यान पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर दारुच्या नशेत पडल्याने डोक्याला मार लागून इसम मयत झाल्याचा अंदाज वर्तवला गेला मात्र इसमाच्या डोक्याला असलेल्या वेगळ्या व्रण मुळे पोलिसांना संशय आला आणि खोलीच्या समोरचा सीसीटीव्ही पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या निदर्शनास पडल्याने पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होणमाने, जयराज देवकर, निखील रावडे यांनी सीसीटीव्ही तपासले असता सदर खोलीमध्ये चार तासापूर्वी एक युवक जाऊन बऱ्याच वेळाने बाहेर आल्याचे दिसताच पोलिसांनी सदर युवकाचा शोध घेत ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दारु पिण्याच्या वादातून घरातील लोखंडी वस्तू चौटकन गौतम याच्या डोक्यात मारून चौटकन गौतम (वय ५८ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. प्रतापपूर ता. इटवा जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश) याचा खून केल्याचे कबूल केल्याने पोलिसांच्या तत्परतेने खुनाचे बिंग फुटले तर याबाबत रामस्नेही चौटकन गौतम वय ३१ वर्षे रा. उरुळी देवाची ता. हवेली जि. पुणे मूळ रा. प्रतापपूर ता. इटवा जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तरुण धुलारुराम ठाकूर (वय २४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. राजनंदगाव छत्तीसगड) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.