शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर येथील महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळ शिरूर आगारातील 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या शेलार बोऱ्हाडे थेऊरकर या तीन कर्मचाऱ्यांचा सपत्नीक जाहीर सत्कार समारंभ एस.टी कामगार संघटना, शिरूर आगार यांच्यावतीने आयोजित करण्यात आला .
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर महाराष्ट्र राज्य एस.टी कामगार संघटना, महाराष्ट्र केंद्रीय अध्यक्ष संदिप शिंदे , पुणे जिल्हा एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीपरावजी परब, एसटी कामगार संघटना पुणे जिल्हा महिला संघटक शीलाताई नाईकवडे, एस टी कामगार नेते उल्हासराव घाटगे , शिरूर एस टी आगार व्यवस्थापक मनिषा इनामके/गायकवाड, उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय नामदेव शेलार (वाहक - 37 वर्षे प्रदीर्घ सेवा), रावसाहेब बोऱ्हाडे (चालक - 34 वर्षे सेवा), श्री. बाजीराव थेऊरकर (वाहक -36 वर्षे सेवा) यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभासाठी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक दादापाटील फराटे, विठ्ठलबापू जंगले (संचालक, शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना), आबासाहेब सूर्यवंशी/जंगले ( मा.कार्यकारी संचालक, शि. ना.श्रीगोंदा सह. साखर का.), बाळासाहेब रावसाहेब पवार, उद्धवबाप्पू शेलार (मा.सरपंच, ग्रा.पं. वडगाव रासाई), सचिन प्रतापराव पवार (चेअरमन, श्रीरामजी सह.वि.का. सोसा, वडगाव रासाई),.अंकुशराव सोनवणे (मा.जि.प.सदस्य), सुनीलभैया गणपतराव जंगले, (मा.पंचायत समिती सदस्य श्रीगोंदा), ह.भ.प. अविनाश महाराज साळुंखे (सादलगावकर), ह.भ.प. भुजंग महाराज शेलार (वडगाव रासाई),.राजेंद्र जाधवराव (मा.शिक्षण मंडळ सभापती, शि.न.पा), विठ्ठल पवार (नगरसेवक, शि.न.पा), मा.श्री.विजय नाझीरकर (उद्योजक), संतोष शेलार,रामदास शेलार (संचालक, श्रीरामजी वि.का. सह.सोसा.), अनिलराव तांबोळी (मा.प्राचार्य,विद्याधाम प्रशाला, शिरूर), सुषमा राजेंद्र शितोळे (मुख्याध्यापिका), प्रा.राणी शेलार (ए. सी.महाविद्यालय, वरवंड), शोभनाताई पाचंगे, राजश्रीताई ढमढेरे (वैभवी महिला महासंघ, शिरूर), प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत (मराठी, विभाग प्रमुख, सि. टी. बोरा कॉलेज, शिरूर), मा.श्री.शांतीलाल काळे (चेअरमन, वि.का.सह.सोसा.निमोणे), अभिजित काळे, (पोलिस उप-निरीक्षक), अनिलराव पडवळ (LIC), राजेंद्र रोडे, (प्रगतशील बागायतदार), संजय कडेकर,.संभाजी नातू व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिरूर एस.टी कामगार संघटना, शिरूर आगारातील सुनील जगदाळे, (अध्यक्ष, शिरूर एस. टी कामगार संघटना), रामभाऊ जेऊघाले (सचिव, शिरूर एस. टी. कामगार संघटना), राजेंद्र काळे, (संचालक, एस.टी को.ऑ. सोसा.) नितीनजी देशमाने, लक्ष्मणबापू जगताप व शिरूर आगारातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशालीताई पाटील (वाहक) यांनी केले. व सर्व उपस्थितीतांचे आभार प्रा.सचिन दत्तात्रय शेलार, शिरूर यांनी मानले.