कान्हूर मेसाईत जाब विचारणाऱ्या ज्येष्ठाला मारहाण

9 Star News
0
शिरूर ( प्रतिनिधी )
          कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील वामन शिंदे हे शेतात काम करत असताना गावातील रभाजी शिंदे हा त्यांना वारंवार शिवीगाळ करत असल्याने वामन यांनी तू नेहमी मला शिव्या का देतो असे विचारले असता रभाजी सह त्याची पत्नी किसनाबाई या दोघांनी वामन यांना दमदाटी करत आमच्या नादी लागू नको नाहीतर बघून घेऊ अशी धमकी देत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
        तर रभाजी शिंदे यांनी लोखंडी गजाने वामन यांना मारहाण करत जखमी केले,     याबाबत वामन बाबू शिंदे (वय ९१ वर्षे रा. कान्हूर मेसाई, गारकोलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रभाजी किसन शिंदे व किसनाबाई रभाजी शिंदे (दोघे रा. कान्हूर मेसाई, गारकोलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!