बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून कसांयाना पुन्हा एकदा दणका ५ गोवंश कत्तलीपासुन वाचवण्यात यश

9 Star News
0
बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून कसांयाना पुन्हा एकदा दणका ५ गोवंश कत्तलीपासुन वाचवण्यात यश
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील यश इन चौकातील पुणे नगर रस्त्याने कतली साठी घेऊन चाललेल्या पाच गोवशाची सुटका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने केली आहे.
२७ मे २०२४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्षक विशाल शिंदे हे रांजणगाव वरुन शिरुर कडे येत असताना छोटा हत्ती टेम्पो MH 12 JF 2326 हि गाडी गोवंश भरुन शिरुर च्या दिशेने येत असताना दिसली संशय आल्याने विलंब न करता ही सर्व माहिती त्यांनी सहकारी बजरंग दलाचे जिल्हा सहप्रमुख अजिंक्य तारू यांना सांगितली त्यांनी तातडीणे पुढे रांजणगाव पोलिस स्टेशन ला कळवुन यश ईन चौकात सापळा रचून पोलिस मदतीने गाडी पकड्याण्यात आली.!गाडीमध्ये १ गावरान गाई व ४ वासरे दाटीवाटीने भरलेले दिसले विचारपुस केली असता कत्तली साठी घेऊन जात असल्याचे कळताच गौरक्षकांनी पोलिस मदतीने त्वरीत रांजणगाव पोलिस स्टेशनला गाडी जमा केली व गाडी ड्रायव्हरसह दोन अरोपींवर गोवंश हत्याबंदी कायदा 
कलम 5A(2),5B,9,11 भा.द.वि.३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे वाघमोडे वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

     वाचवलेले ५ गोवंश श्री गौरक्षण पांजरपोळ संस्था शिरुर येथे सुखरुप सोडण्यात आले.
      गोवंश वाचवण्यासाठी बजरंग दलाचे गोरक्षक विशाल शिंदे ,प्रतीक शर्मा ,नानासाहेब लांडे बजरंग दल रांजणगाव संयोजक रवी जगदाळे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु,गोरक्षक विशाल पवार,अदित्य सणसे,रवींन्द्र बैनाडे,लोकेश शर्मा,रोहीत दरडा या गोरक्षकांनी भाग घेऊन पोलीसांच्या मदतीनें परिश्रम घेतले.

कारवाई यशस्वी करण्यासाठी रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व पी. एस. आय सविता काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!